पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान 

पिंपळे गुरव : 
पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आयपीएल क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऋतुराज गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी आर्दश माता पिता पुरस्कार गायकवाड यांच्या मातोश्री सविता गायकवाड व वडील दशरथ गायकवाड यांचा देखील सन्मान करण्यात आला.   हा सन्मान दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजित सिंह कोचर, नगरसेवक राजू बनसोडे, रविंद्र बाईत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
जुन्या सांगवीत मधुबन सोसायटीत हा कार्यक्रम झाला. ऋतुराज गायकवाड यांच्या घरी क्रीडाशिक्षक उपस्थित होते. गायकवाड यांच्या मातोश्री  सविता गायकवाड व वडील दशरथ गायकवाड यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी  अशिष उबाळे, सुनील साठे, योगेश बोराडे, गणेश जाधव, सुचित्रा कांबळे, पराग ओगळे, रिबेका दास यांना सन्मानित करण्यात आल आहे.
आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून आयपीएल सारख्या खेळामध्ये ज्या प्रमाणे ऋतुराजची निवड झाली, ती निवड ऋतुराज सारख्या खेळाडूने सार्थ ठरवली.  त्याचप्रमाणे ऋतुराजने यापुढे भारतीय संघात निवड व्हावी यासाठी प्रयत्न करावे असं यावेळी नगरसेवक राजू बनसोडे म्हणाले आहेत. तसेच भारतीय संघात निवड होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुढील वाटचालीसाठी ऋतुराजला नगरसेवक राजू बनसोडे  यांनी शुभेच्छा दिल्यात .