शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली शिवसेनेचे खासदार, संजय राऊत यांची भेट

संजय राऊत यांचे अहमदनगरमधील जागावर लक्ष केंद्रित

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असून अहमदनगर शहरातील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी सोलापूर या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खास भेट घेऊन उमेदवारी संदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान संजय राऊत यांनी अहमदनगरमधील जागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. कारण विधान सभेच्या निवडणुकांसाठी नगरमधील एक एक जागा महत्वाची असल्याचे मानले जाते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे युवा सेनेचे विक्रम राठोड मंदार मुळे यांनी भेट घेऊन उमेदवारी संदर्भात चर्चा केली असून, उमेदवारी लवकरच जाहीर होईल असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. एकंदरीतच शिवसेना पक्षप्रमुख उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालणार हे देखील पाहणं येणाऱ्या पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे याबाबतीत अनेक आडाखे बांधण्यात येत आहेत.