मुंबई : “आमच्या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. सरस कामगिरी केली. याचे समाधान आहे. गेल्या दोन वर्षात खऱ्या अर्थाने आम्ही लोक कल्याणाच्या योजना राबवल्याने विकासाला गतीशील लोकप्रिय योजनांमध्ये शेतकरी कामगार महिला, भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलके करू शकलो. याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातील प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनाच्या धर्तीवर संविधानभवन उभारण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही, लाडकी बहीण योजना जाहीर केली. तुम्ही निधी कसा देणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही वर्षाला 18,000 रुपये साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांची, वीज बिल माफी, गृहिणींना तीन मोफत सिलेंडर, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, ज्येष्ठांना तीर्थयात्रा अशा योजना जाहीर केल्या आहेत. सुखी कुटुंबाला काय हवे ते पाहून आम्ही या सर्व योजना आखल्या आहेत.”असे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडले.