डॉ. शीतल आमटे यांनी केली आत्महत्या   

मुंबई
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि  तरुण सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.  मागील काही काळापासून बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन या सामाजिक उपक्रमाबद्दल बरेच वाद होते.  या सर्व वादांच्या केंद्रस्थानी असलेल्या शीतल आमटे यांनी अखेर आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आपली आयुष्य संपवलं.  त्यामुळेच शीतल आमटे यांच्या कामाविषयी देखील चर्चा होत आहे.  याशिवाय शीतल आमटे यांच्या संदर्भातील वादाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.