नेहरुनगरच्या क्रीडांगणाच्या समस्या सोडवा

पल्लवी फाउंडेशनचे वार्ड अधिकऱ्यांना मागणी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेहरूनगर कुर्ला पूर्व,  येथे पल्लवी फाऊंडेशन चे कार्यालय आहे. हि वास्तू सुरक्षित राहावी म्हणून  तेथे तारेचे कम्पाऊंड घातले असता ते तोडून काही खेळाडू या वास्तूत प्रवेश करतात.  आणि  तेथे असलेल्या मोकळ्या जागेत बसून  अंमली पदार्थांचे सेवन करुन काचा,खिडक्या,दरवाजा यांना दगड व अवजड वस्तू फेकून मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान करतात. त्याचप्रमाणे मैदान सोडून संस्थेच्या समोरील भागात मैदानी  खेळ खेळून परिसरातील  वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करतात. क्रीडांगणात रात्री-अपरात्री काही खेळाडू हे खेळत असताना त्यांना वेळेचे काही बंधन अथवा धाक राहिला नाही. क्रीडांगणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकास या बाबत वेळोवेळी विचारणी केली असता ते अरेरावीची भाषा वापरतात, तसेच  हे चुकीचे कृत्य करणाऱ्या खेळाडूंना पाठीशी घालून त्यांना प्रोत्साहन देतो.

 

या क्रीडांगणा मध्ये २४ तास एकच सुरक्षारक्षक काम करतो त्याच्या अंगात कुठ्ल्याही प्रकारचा गणवेश नसतो त्याचप्रमाणे त्याच्याकडे ओळखपत्र,सुरक्षाकाठी,शिट्टी अशी कुठलीही सामग्री उपलब्ध नसते. महानगरपालिकेकडून या क्रीडांगणामध्ये २४ तासासाठी फक्त एकच सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे का? असा सवाल देखील निर्माण होतो. क्रीडांगण शौचालय देखील हा सुरक्षारक्षकच सांभाळतो त्याच्याकडे या बाबत कुठलीही अधिकृत परवानगी नसून शौचालयात जाणाऱ्या नागरिकांकडून तो अनधिकृत पणे पैसे देखील गोळा करतो हि किती गंभीर बाब आहे? या सुरक्षारक्षकाने क्रीडांगणात असलेल्या खोलीत अतिक्रमण केले आहे. या खोली मध्ये त्याचे आई-वडील तो आणि त्याचे काही साथीदार बऱ्याच कालावधीपासून वास्तव्यास आहेत. त्याला तेथे कुटुंबासहित राहण्याचा अधिकार नसून या बेकायदेशीर कृत्याला महानगरपालिकेच्या संबंधित ठेकेदाराचा जाहीर पाठींबा आहे. या संपूर्ण घटनेची माहिती संबंधित ठेकेदाराला प्राप्त असून त्याला जाब विचारला असता तो अधिकरी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतो. या संबंधी  वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता, ते सुद्धा ह्याची दाखल घेत नाहीत.  उलट सुरक्षारक्षकाकरवी धमकी देऊ केली.

 

साधारण १५ ते २० दिवसापूर्वी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नेहरूनगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना या सुरक्षारक्षकास त्यांनी क्रीडांगणा मध्ये मद्यप्राशन व काही विकृत हरकती करताना रंगेहात पकडले होते ही अतिशय गंभीर बाब आहे. या घटनेची सविस्तर माहिती असूनही  एल् वार्ड येथील श्री नलगे साहेब व संबंधित ठेकेदार यांनी  त्यावर कुठलीच कारवाई केली नाही. वास्तविक पाहता या वर त्वरित कारवाई करुन त्याठिकाणी नवीन सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही न करता या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. अश्या गलथान कारभारामुळे क्रीडांगणावर असलेल्या मालमत्ता व क्रीडांगण सुरक्षेचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झाला आहे. एल् वार्ड आयुक्त या नात्याने आपण वरील सर्व गोष्टींची तातडीने दाखल घेऊन तेथे नवीन सुरक्षारक्षक व ठेकेदार यांची नेमणूक करावी व संबंधित अधिकाऱ्यांना देखील या बाबत सूचना करुन लक्ष घालण्यास सांगावे या क्रीडांगणात अनेक समस्या आहेत त्यासुद्धा आपण पुढाकार घेऊन सोडवाव्यात अशी मागणी  पल्लवी फाऊंडेशन ने केलीय.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.