सीना नदी ते गाडगीळ पटांगण बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ
खासदार सुजय विखे यांच्या निधीमुळे शहरांतील अनेक विकास कामे पूर्णत्वास -अभय आगरकर
नगर-महायुती सरकारच्या काळात अनेक विकासाचे कामे मार्गी लागली आहेत.अनेक वर्षापासून या भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नाल्याचे स्वरूप प्राप्त होते.बंद पाईप गटाच्या कामामुळे नालेगाव भागातील गटारीचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.खासदार सुजय विखे यांच्या निधीमुळे हे काम पूर्णत्वास येत आहे.असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अँड.अभय आगरकर यांनी केले आहे. खासदार सुजय विखे यांच्या विकास निधीतून नालेगाव गाडगीळ पटांगण येथे सीना नदी पासून नालेगाव गाडगीळ पटांगण पर्यंत २६० मिटर १२०० व्यासाची बंद पाईप गटार कामाचे उद्घाटन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,प्रदेश सदस्य वसंत लोढा,नगरसेविका सोनालीताई चितळे,माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे,संतोष गेनाप्पा,अजय चितळे,मयुर बोचुघोळ,सरचिटणीस प्रशांत मुथा,संजय वल्लाकट्टी,राजु औटी,बाळासाहेब खताडे, रामदास क्षीरसागर महाराज आदी उपस्थित होते.वसंत लोढा म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून पाऊस काळात आनंदी बाजार ते नालेगाव या भागात नाल्याचे स्वरूप निर्माण होते.व सर्वत्र नालीतून काळ रस्त्यावर येतो.खासदार सुजय विखे यांच्या निधीतून 35 लाख रुपये खर्च करून सीना नदी ते नालेगाव गाडगीळ पटांगणापर्यंत बंद पाईप गटार काम होत आहे. तसेच नालेगाव ते आनंदी बाजार बंद पाईप गटारचे काम उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून होणार आहे.यामुळे आनंदी बाजार ते नालेगाव परिसरातील पावसाचे पाणी रोडवर येणार नाही.अजय चितळे म्हणाले,या कामासाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केले आहेत.तसेच भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांच्या प्रयत्नातून खासदार सुजय विखे यांच्या निधीतून एक काम पूर्ण होणार आहे.गणेश कवडे म्हणाले,गेल्या 20 वर्षापासून सर्व नगरसेवक या कामासाठी पाठपुरावा करीत आहेत.तसेच वसंत लोढा यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.