सततची तापमान वाढ पृथ्वीसाठी चिंतेचा विषय असल्याने यावर संशोधन होणे गरजेचे श्री.अरविंद पारगावकर

अभियांत्रिकीतील यांत्रिकी विभागात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

नगर – निसर्गातील सततचा बदल हा मानवी जीवनाला अपायकारक ठरत आहे एकाच दिवशी वर्षातील तीनही ऋतूंचा अनुभव आपल्याला अनेकदा येतात सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री पाऊस अशी परिस्थिती वारंवार अनुभवाला येते 18 व्या शतकापासून होणारी सततची तापमान वाढ पृथ्वीसाठी अतिशय चिंतेचा विषय असून यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे अतिशय गरजेचे आहे नाहीतर ग्लोबल वार्मिंग मुळे होणारे दुष्परिणाम मानवी जीवनावर दुर्गामी परिणाम करतील. असे प्रतिपादन स्नायडर इलेक्ट्रिकल्स चे इंजिनियर श्री अरविंद पारगावकर यांनी केले.

      विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागात दोन दिवस आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने  करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री अरविंद पारगावकर, डॉ.संजय सावंत, डॉ.संदीप काळे डॉ.पी.एम. गायकवाड, प्राचार्य डॉ.उदय नाईक, प्रा.सुनिल कल्हापुरे, डॉ.अभिजीत दिवटे, डॉ.रवींद्र नवथर तसेच ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या परिषदे मध्ये देशातील विविध प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

     यंत्र अभियांत्रिकी विभाग आणि टेक्नॉलॉजी रिसर्च अ‍ॅड इनोवेशन सेंटर, अकेंडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अ‍ॅड वेस्ट वॉटर इनोव्हेशन जोहान्सबर्ग साउथ आफ्रिका आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोयनंट युनिव्हर्सिटी ओटा नायजेरिया यांच्या संयुक्त विद्यमाने मटेरियल सायन्स या विषयाच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि ऍडव्हान्सेस इन एनर्जी और एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग या विषयाच्या पहिल्या अशा एकूण दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले होते.

     सदरील आंतरराष्ट्रीय परिषदेत मटेरियल सायन्स आणि एनर्जी अ‍ॅड पन्तहायरमेंट इंजीनियरिंग या विषयात काम करणारे संशोधक शास्त्रज्ञ या विषयातील शैक्षणिक तज्ञ सहभागी झाले. होते.या आंतरराष्ट्रीय परिषद हायब्रीड मोड म्हणजेच इन पर्सन आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून मटेरियल सायन्स एनर्जी इंजीनियरिंग आणि एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग या विषयात होत असलेल्या अत्याधुनिक संशोधना संदर्भात सादरीकरणासाठी विविध असे एकूण सुमारे 348 शोध निबंध प्राप्त झाले या मधून निवडक 148 शोध निबंधांचे एकूण 17 सत्रांमधून सादरीकरण झाले. निवडक शोधनिबंध हे  भारतातील नामांकित आयआयटी तसेच एनआयटी महाविद्यालयाचे तसेच इतर अल्बानिया, अल्जेरिया, फ्रान्स, मोरक्को, पेरु, पोलंड, रशिया, साऊथ आफ्रिका, तैवान, गायलंड, मलेशिया, मॉरिशस, इटली, इंडोनेशिया, इराण  तुर्की कतार, तैवान, ऑस्ट्रेलिया, यूएसए, बांगलादेश आणि ओमान अशा एकूण 28 देशातून 900 पेक्षा जास्त लेखकांकडून शोधनिबंध प्राप्त झाले होते. या परिषदेसाठी की नोट स्पीकर्स म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रा. डेव्हिड वुड रिल्यूआर एनर्जी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलेंगी केंजड़ा, प्रा. बीरा गुडे, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट डायरेक्टर ऑफ नॉर्थ वेस्ट वॉटर इन्स्टिट्यूट यूएसए प्रा. सुटेरीस कालोगिक डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल सायन्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी लिमा सोल सायप्रस यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. श्री.अरविंद पारगावकर यानी सदरील आतरराष्ट्रीय परिषद म्हणजे मटेरियल, एनर्जी आणि एन्व्हायरमेंट यासंदर्भात होत असलेल्या अत्याधुनिक संशोधना संदर्भात संयुक्त प्लॅटफॉर्म सर्वांना  उपलब्ध करून दिल्याचे सांगून हा एक दुग्ध शर्करा योग असल्याचे मत नोंदविले, श्री महेश निपानीकर   मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की वेगवेगळ्या मटेरियल्स, साधन सामुग्री संदर्भात माहिती देऊन कंपोझिट्स, नैनी कंपोझिट या अत्याधुनिक मटेरियल चे अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्व विशद केले शिवाय कार्बन फुटप्रिंट तसेच सस्टेनेबिलिटी यावरही प्रकाश टाकला. आणि डॉ. संजय सावंत यांनी रिसर्च मेथोडोलॉजीचे अभियांत्रिकेतील महत्त्व विशद करून, इंडस्ट्री 4.0 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. ब्लॉक चैन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स याचे दैनंदिन जीवनातील महत्व सांगितले. तसेच फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी डॉ.पी.एम. गायकवाड, संचालक  डॉ.अभिजीत दिवटे, उपसंचालक प्रा.सुनील कल्हापूरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, महाविद्यालयातील सर्व अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख तर आंतरराष्ट्रीय परिषदेत ऑनलाइन पद्धतीने, जगभरातील विविध विद्यापीठातील शैक्षणिक तज्ञ तसेच डॉ. संदीप काळे डायरेक्टर टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोवेशन सेंटर इंडिया डॉ.अजय मिश्रा अकॅडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अ‍ॅड वेस्ट वॉटर इनोवेशन्स जोहान्सबर्ग साउथ आफ्रिका, डॉक्टर संडे ओयेडेपो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोवेनंट युनिव्हर्सिटी ओटा नायजेरिया आदी मान्यवर सदरील अंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाले,

     उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत असताना डॉ. संडे ओये डेपो यांनी इंजीनियरिंग क्षेत्रात इंटर डिसिप्लिनरी क्षेत्रात रिसर्च चे महत्व विशद करून सदरील अंतरराष्ट्रीय परिषदेस शुभेच्छा दिल्या. आणि ही आंतरराष्ट्रीय परिषद हायब्रीड मोडमध्ये असल्या कारणाने एकूण 15 शोधनिबंधाचे सादरीकरण ऑफलाइन मोड मध्ये आले आणि उर्वरित शोधनिबंधाचे सादरीकरण ऑनलाईन मोड मधून पार पडले. तसेच यंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र नवधर यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न करून मटेरियल सायन्स, एनर्जी अ‍ॅड एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग या परिषदेत सहभागी झालेल्या रिसर्च स्कॉलर्स इंडस्ट्रीमध्ये काम करणारे तज्ञ, शैक्षणिक संस्थातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सदरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्लॅटफॉगे म्हणून उपयोग करून आपल्या संशोधनास या परिषदेच्या माध्यमातून शोकेस केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. डॉ. कानिफ मरकड यांनी सदरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे कन्व्हेनर म्हणून काम पाहिले, सदरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे सुत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती सुप्रिया गाडे यांनी केले.

     संस्थेचे चेअरमन कैबिनेट मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजना निमित शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.