महापालिकेने दिलेल्या 75 टक्के शास्त्री माफीच्या मुदत वाढीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दहा डिसेंबर ते ३१ डिसेंबर या 22 दिवसात 3611 जणांनी 3.98 कोटींचे थकबाकी जमा करत त्यापोटी 81 लाखांचे सवलत घेतली आहे. यातून मनपाला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान 29 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या 33 दिवसात 8000 24 जणांनी सवलतीचा लाभ घेत 13.34 कोटींचा कर भरून 3.46 कोटींची सवलत घेतली. यातून महापालिकेची 9.87 कोटींचे वसुली झाली आहे. आयुक्त पंकज जावळे यांनी 29 नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर या काळात 75 टक्के शास्त्री माफीची योजना जाहीर केली होती. या काळात 4413 जणांनी 9.36 कोटींची थकबाकी जमा करत त्या पोटी 2.65 कोटींची सवलत घेतली होती. यातून मनापासून तिजोरीत 6.70 कोटींची भर पडली होती. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा शास्ती माफी योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिली. यातून 3.17 कोटींची तरसुदी झाली आहे. शास्त्री माफी योजनेची ही अखेरची संधी असल्याचे आयुक्त जावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Prev Post
Next Post