पाच लाख पतंग गुजरात आणि लखनऊला जाणार

नगर शहरात वर्षभर चालते पतंग निर्मितीचे काम, 5 ते 500 रुपयांपर्यंत पतंगांचे दर

नागपंचमी तसेच मकरसंक्रांतीनिमित्त पतंगांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हात वर्षभर पतंग निर्मितीचे काम सुरू असते. नगरमध्ये पाच लाखांवर पतंग तयार करत आहेत. या पदांकांना गुजरात आणि लखनऊ येथील व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे तेथील हे नगरी पतंग विक्रीसाठी पाठवले जातात. पतंगासाठी कच्चामाल बडोदा तसेच कलकत्ता येथून मागवला जातो. मकर संक्रांतीच्या कालावधीत शहरासह जिल्ह्यात पतंगांना मोठी मागणी असते. शहरात पाच ते सहा ठिकाणी पतंग तयार केले जातात. वर्षभर पतंग निर्मितीचे काम सुरू असते. चार ते पाच लाख पतंग वर्षभरात तयार होतात. या पतंगांना महाराष्ट्र सह गुजरात लखनऊला मागणी असल्याने तेथे पाठवले जातात जात असल्याचे विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. पतंगासाठीच कच्चा माल बडोदे, पुणे इथून उपलब्ध होतो. लहान आकारापासून ते चार ते पाच फूट आकाराचा पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहे. नगर शहरात बागडपट्टी प्रोफेसर कॉलनी, झेंडी गेट परिसर तसेच इतर किरकोळ दुकानदारांकडे ही पतंग आणि मांज्या उपलब्ध आहेत. मागील वर्षाच्या तुला नाही. महागाई वाढल्यामुळे त्याचा परिणाम पतंगांच्या दरात सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतचे पतंग उपलब्ध आहेत.