शिक्षिकेचे अश्लील फोटो व्हायरल…..

मोबाइलला क्रमांक टाकला पॉर्न साईट वर

अहमदनगर (प्रतिनिधी) : देशभरात कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन वर्ग चालू होते . या काळात विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन शी संपर्क आला .

विद्यार्थ्यांनी याच स्मार्टफोन च्या माध्यमातून शिक्षकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साईट टाकणे , असे धक्कादायक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

मुलांमध्ये तयार होत असलेल्या विकृतीने विचार करण्यास भाग पडले आहे . जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेच्या फोटोचे मॉपिंग करून , त्याचे अश्लील फोटो मध्ये रूपांतर करून , ते इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आले तसेच त्या शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक पॉर्न साईट अपलोड करण्यात आला .

एका विद्यार्थ्यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक गे साईट वर अपलोड करण्यात आला , तर चौथ्या प्रकरणात एका शालेय मुलीचे बनावट फेसबुक अकॉउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल करण्यात अली

. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तीसोबत गेल्या १५ दिवसांत या घटना घडल्या आहेत . यातील पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर , तपासात हे गुन्हे करणारे कुणी सराईत सायबर गुन्हेगार नसून तर पीडितांच्या ओळखीचे च अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे .

यातील 2 अल्पवयीन आरोपीना पोलिसानी ताब्यात घेतले आहे .