केडगावात राहणाऱ्या महिलेने पनवेल (ता.रायगड) येथील व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ लाखांना लुटले

अश्लील फोटो सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी

अहमदनगर(प्रतिनिधी) ; पनवेल ता रायगड येथील एका व्यक्तीस केडगावात राहणाऱ्या महिलेने ता. ८ ऑगस्ट ते ता . १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत गोडबोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले .

आपली आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे भासवून वेळोवेळी पैसे, तीन तोळे वजनाची सोन्याची चैन , युनियन बँक आणि भारतीय स्टेट बॅंकचे एटीएम कार्ड घेतले .

त्यामाध्यमातून ५ लाख रुपये घेतले . या पीडित व्यक्तीने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यावर संबंधित महिलेने अश्लील फोटो सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची हि धमकी हि दिली .

या पीडित व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. २७)
दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिला आणि तिच्या एका साथीदारांवर खंडणी आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.