राहुरी तालुक्यात पिता व पुत्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. जन्मदात्या बापाने एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दिनांक ९ जुलै रोजी घडली.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा
हा निंदनीय प्रकार घडला आहे.गणेश बाळासाहेब म्हसे याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान गणेश म्हसे हा तरूण त्याच्या घरात अंथरुणावर झोपलेला होता. त्यावेळी त्याचे वडील आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे हे दोघे आले. त्यांनी गणेश म्हसे याला विचारले कि, तुझे दुखणे बरे आहे का, तु जेवण केले का. तुझ्यासाठी औषध आणले आहे. तु औषध पिवुन घे. मग तुला बरे वाटेल. असे म्हणाले असता गणेश म्हसे याने त्यांच्या हातात घासावर फवारणी करण्यासाठी असणाऱ्या विषारी औषधाची बाटली पाहीली.
तेव्हा त्याने ते विषारी औषध घेण्यास नकार दिला. दरम्यान गणेश म्हसे याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे याने गणेशला पाठीमागुन दाबुन धरले. आणि वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे याने त्याच्या हातातील घासावर फवारणी साठी आणलेले औषध गणेशच्या तोंडात ओतले. गणेश म्हसे त्यांना विरोध करत होता.
परंतू आरोपींनी त्याला संगनमत करून बळजबरीने विषारी औषध पाजून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.गणेश बाळासाहेब म्हसे याच्या फिर्यादीवरून दिनांक २५ जुलै रोजी राहुरी पोलीसांत आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे दोघे राहणार कोंढवड ता. राहुरी. यांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.