नगर शहरात श्री राम मंदिर निधी संकलनास सुरुवात
नगर शहरात या भव्य मंदिर निर्माण समर्पण अभियानाची सुरुवात करण्यात आली .
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला आहे. या मंदिर निर्माणासाठी जगभरातून निधी संकलन अभियानास सुरुवात झाली आहे . नगर शहरात या भव्य मंदिर निर्माण समर्पण अभियानाची सुरुवात करण्यात आली .
नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला . श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत हरिभक्त परायण परमपूजनीय भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करून या अभियानास सुरुवात करण्यात आली . यावेळी श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक लाख रुपये देण्यात आले. शहर शिवसेनेच्या वतीने ११ हजार १११ रुपये देण्याची घोषणा विक्रम राठोड यांनी केली .
यावेळी एड अभय आगरकर , शहर संघचालक शांतीभाई चदे रवींद्र मुळे,हिराकांत रामदासी , वसंत लोढा , अशोक कानडे , सचिन पारखी , तसेच रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर कोणीही बांधू शकते , बिर्ला सारख्या उद्योगपतींनी देखील देशात भव्य अशी मंदिरे बांधली आहेत. भगवान श्री कृष्ण आणि श्री लक्ष्मी नारायणाची मंदिरे त्यांनी बांधली परंतु त्या मंदिरांना बिर्ला मंदिर असेच संबोधले जाते . अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यास देखील अशी मोठी माणसे मोठा निधी देऊ शकतात . त्यात ते मंदिर बांधले देखील जाऊ शकते . पण हे राम मंदिर होणे ही सर्व जाती धर्मातील भारतीयांची अस्मिता आहे. त्यामुळे या मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयाचा हातभार लागावा यासाठी हे अभियान राबविले जात आहे. १९९२ साली कारसेवेद्वारे जो विवादित ढाचा जमीनदोस्त झाला तो दिवस काही जण काळा दिवस असल्याचे मानतात . वास्तविक हा दिवस सुवर्णअक्षरानी लिहून ठेवला जाईल . आणि जर त्याला कोणी काळा दिवस म्हणत असेल तर आणखी २ काळे दिवस राखून ठेवा . अयोध्या तो एक झांकी हे अब काशी मथुरा बाकी हे याचे सूतोवाच हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांनी आपल्या समारोपाच्या भाषणाद्वारे केले . यानंतर विशाल गणपती मंदिरात महा आरती करून या मोहिमेस सुरुवात झाली . श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन समिती, नगर शहर यांच्या वतीने १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या श्रीराम भक्तांकडे यथाशक्ती आपला निधी द्यावा. आपणास शक्य असेल तर आपण ही या निधी संकलन अभियानात प्रत्यक्ष सहभागी व्हावे.असे आवाहन यावेळी करण्यात आले.