Voting for Gram Panchayat.
संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बुऱ्हानगर ग्रामपंचायत निवडणुकीत आपण लक्ष घालत नसल्याचा खुलासा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलाय .
संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बुऱ्हानगर ग्रामपंचायत निवडणुकीत आपण लक्ष घालत नसल्याचा खुलासा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलाय . विधानसभा निवडणुकीत गावाने जे आपल्यावर भरभरून प्रेम दिल आणि गावातून मोठ मताधिक्य दिल . त्यामुळे आपण शपथेवर गेली ६ टर्म ग्रामपंचायतीपासून दूर आहोत . बुऱ्हानगर चे नागरिक गुण्यागोविंदाने रहातात . फक्त गावातील एक दोन कुटुंबे गावच्या एकीच्या विरोधात आहेत. यावर्षी गावची निवडणूक बिनविरोध होणार होती मात्र गावच्या विघ्न संतोषी लोकांनी गावकऱ्यांना निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय . एरवी गावच्या स्थानिक राजकारणापासून आपण कोसो दूर असल्याचा दावा त्यांनी केला .