Gram Panchayat voting.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया दिनांक १५ जानेवारी रोजी राबविण्यात आली .

               महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया दिनांक १५ जानेवारी रोजी राबविण्यात आली . यात किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली . संपूर्ण राज्यभर गावोगावी ज्या ठिकाणी मतदान होते तिथे सकाळपासूनच मोठा उत्साह पाहायला मिळाला . नगर जिल्ह्यात देखील ७०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान होते . यासाठी तब्बल १५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती . जिल्ह्यातील ५० संवेदनशील होत्या तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर तालुक्यातील बुहरानगर इथे देखील शांततेत मतदान झाले .ही ग्रामपंचायत संवेदनशील म्हणून घोषित असल्याने गावात मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गावच्या जिल्हापरिषद प्रार्थमिक शाळेत मतदान केंद्र होते . तिथे मतदारणी सकाळपासूनच मतदानासाठी रांग लावली होती .  बुर्हानगर हे राहुरी विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे गाव असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कर्डीले यांनी सकाळी लवकर जाऊन मतदानाचा हक्क बजावला . त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .