बेकायदा वृक्षतोड केल्यास आता होईल 50000 पर्यंत दंड

मुंबई : बेकायदा वृक्षतोडीसाठी यापुढे पन्नास हजारापर्यंत दंड आकारला जाईल. अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. 1967 मध्ये कायदा करून एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. एवढ्या वर्षानंतर पन्नास हजारांचा दंडच योग्य ठरेल. यासंदर्भात लेखी आदेश सोमवारपर्यंत जाहीर केला जाईल. मंडळापुढे हा विषय आणून त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल. असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्याबाबत उद्धवसेनेचे राजन साळवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कोकण, नांदेड, जळगाव, वाशिम, सांगली, पुणे, परभणीसह इतरही जिल्ह्यांमध्ये विकासाच्या नावाखाली वृक्ष विनापरवानगी तोडले गेले. याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.