अहमदनगरमध्ये अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेची कारवाई

नगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील पत्रकार चौक, अप्पू चौक, न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्लीगेट या रस्त्यावरील फलक हटवण्यात आले. शहरातील सर्व फ्लेक्स बोर्ड काढून घेण्याचे आदेश प्रशासकीय यशवंत डांगे यांनी दिले. शहरात अनेक ठिकाणी जाहिरात फलक, शुभेच्छा फलक, फ्लेक्स, बोर्ड विनापरवाना लावण्यात आले आहेत. ते फलक हटवण्याचे आदेश प्रशासक डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील सर्व संबंधित नागरिक, जाहिरातदार, विविध कार्यकर्ते यांनी तातडीने सर्व फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक, खांबावरील अनधिकृत जाहिराती स्वतःहून काढून घ्यावेत. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असा इशारा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.