नागरिकांनो पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवा
महानगरपालिका करणार कारवाई : यशवंत डांगे यांचा इशारा
शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवलेल्या नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जाऊन पाण्याचा अपव्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात. असे निर्देश महानगरपालिकेने दिले आहे. नळांना तोट्या नसलेल्या नळ धारकांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.