मुबलक पाणी असताना वीज तोडून रब्बी वाया घालवला तर शेतकरी आक्रमक होतील- राजू शेट्टी

मुळात वीज वितरण कंपनीने सदोष विजबिले शेतकऱ्यांना दिली आहे. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाही. अशात आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने सरसकट वीज कनेक्शन तोडत आहे. यंदा पाऊस चांगला आहे, विहिरींना पाणी आहे, अशात जर वीज कनेक्शन जर तोडले गेले तर येणारा रब्बी हंगाम शेतकरी करू शकणार का, या परस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही, तोडलेले वीज कनेक्शन हे तातडीने जोडावे, योग्य बिले द्यावीत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

जामखेड मध्ये आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यसरकरच्या वीज धोरणावर आणि करवाईवर आसूड ओढले. कोरोना काळात एकीकडे वीजबिल देणे थांबवले मात्र या काळातील सरासरी बिले काढण्यात आली. विजमंत्री आपले आश्वासन पाळत नाहीत, त्यापुढे जी विजबिले काढली गेली ती चुकीची काढली गेली 5 HP ला 7.5 HP 7 HP ला 10 HP असे तांत्रिक पद्धतीने जदाची बिले काढली गेली. मुळात जागेवर येत प्रत्येक्ष रिडींग किती घेतले, त्यात तथ्य किती हा संशोधनाचा भाग आहे असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. अतिवृष्टी, पीकविमा याबाबत सरकार उदासीन आहे. ऊसाचे पैसे एकरकमी मिळत नाहीत. यापरस्थितीत शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.सातारा कारखाना गुऱ्हाळ प्रश्नावर बोलताना शेट्टी यांनी शेतकरी कष्ट करतो, त्याला ऊस पिकवतांना अनेक खर्च असतात त्यामुळे त्याला त्याच्या घामाचा पैसा मिळाला पाहिजे असे शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.एसटी आंदोलनाबाबत परिवहन मंत्र्यांनी दमबाजीचे वक्तव्य करू नये तर कामगारांनी पण समजुतीची भूमिका घ्यावी. मी सुद्धा लहानपणी एसटी ने प्रवास करूनच शिक्षण पूर्ण केले आहे. अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुका अध्यक्ष, मंगेश आजबे, युवक ता. अध्यक्ष ऋषिकेश डुचे, प्रगतशील शेतकरी युवराज गोलेकर, तालुका संघटक हनुमान उगले, योगेश पवार, गणेश परकाळे गणेश खेत्रे, गणेश हगवणे, बाबु साळुंके,आदि उपस्थित होते