२० मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन

असंघटित कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन

शहरातील टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सोमवार दि.२० मार्च रोजी  जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळावा घेण्याचा निर्णय विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराचे प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नुकतीच ही बैठक कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक सचिन साळवे, अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे, जिल्हाध्यक्ष नागेश भिंगारदिवे, अशोक मोरे, दत्ता शिंदे, दीपक गायकवाड, मंगेश जावळे, सुनिल साळवे, संजय जाधव आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

या मेळाव्यात ऊस तोड, बांधकाम कामगार, नाक्यावरील कामवार, शेतमजूर आदी असंघटित कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या मेळाव्याच्या माध्यमातून असंघटित कामगारांमध्ये त्यांच्या न्याय, हक्काची जागृती करण्यात येणार आहे .  तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवून, कामगारांच्या प्रश्‍नांची दखल घेतली न गेल्यास सर्व कामगारांना एकजुट करुन सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत मेळाव्यात चर्चा होणार आहे.