अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात
नगर; अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असून अनेक तरुण मंडळांनी यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि वैज्ञानिक संशोधन यावर देखावे सादर केले आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, एकमुखी दत्त मंदिर, माणिक चौक या ठिकाणी चंद्रयान तीनचा हलता देखावा सादर केला असून हे मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत असते. या देखाव्यांच उद्घाटन युवा सेनेचे विक्रम राठोड आणि शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, विशाल वालकर, गणेश दहिडे, महावीर शिंगी, बंटी रासकर, तुषार पोरे, अभी दहिडे, हेमंत हरबा, प्रतीक बोगा आणि श्रीपाल शिगी आदी उपस्थित होते.