खंडेरायाच्या जेजुरी गडावर “चंपाषष्ठी” उत्सवास प्रारंभ

येळकोट येळकोट, जय मल्हार

जेजुरी : 

महाराष्ट्रच लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं, पूजलं जातं.. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो.. तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव… खंडेरायाच्या गडावर घटस्थापन करुन  साज-या होणा-या ‘चंपाषष्ठी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या “देवदिवाळी” ला आज उत्साहात सुरवात झाली आहे.….
आज सकाळी मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करून नवीन पोशाख परिधान करण्यात आला.  देवसंस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे अलंकार परिधान करण्यात आले आहेत .
 चंपाषष्ठीनिमित्त मुख्य मंदिर, गाभारा, व घटस्थापना स्थळ आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आला असून गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे…. गडावर सहा दिवस आणि रात्री “चंपाषष्ठी” हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो…