दोन दिवसात ऊस दर जाहीर करा,अन्यथा कारवाई

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी दोन दिवसात उसाचे दर्जा जाहीर करावेत. साखर कारखाने ऊसदर जाहीर करणार नाहीत.अशा कारखान्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयास दिला. दरम्यान दोन दिवसात उसाचे दर जाहीर न केल्यास गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर आणि ऊस वाहतूक दर दराबाबत बुधवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीला प्रादेशिक साखर उपसंचालक प्रवीण लोखंडे,उपप्रादेशिक अधिकारी उर्मिला पवार,प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी पक्ष आणि विविध शेतकरी संघटना संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नियमावर बोट ठेवले. जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला मात्र एकही साखर कारखान्याने उसाचे दर जाहीर केलेले नाहीत. वास्तविक पाहता गाळप हंगाम सुरू होण्याआधी उसाचे दर निश्चित करून ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करणे हे बंधनकारक आहे, पण कोणतीही खातारजमा न करता साखर सहसंचालक कार्यालयाकडून कारखान्यांना गाळप सुरू करण्यास परवाना दिला गेला. उसाचे दर जाहीर नसताना गाळपाचा परवाना दिला कसा असा सवाल शेतकरी संघटनेचे वकील अजित काळे यांनी उपस्थित केला. इतर संघटनांच्या प्रतिनिधीने उसाला प्रतिदिन साडेतीन हजार रुपये दर देण्याची मागणी करत कारखानदारांच्या अवस्तव खर्चाकडे जिल्हाधिकारी सालीमठ यांचे लक्ष वेधले. उसाचे दर जाहीर नसताना पहिला हप्ता 3000 दीडशे रुपये देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय आहे. त्यातून वाहतूक खर्च कपात करू नये, वाहतूक खर्च कपात न करता पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी यावेळी शेतकरी संघटना संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.