जिल्ह्यात 24 ते 26 नोव्हेंबरला येलो अलर्ट

शहरासह जिल्ह्यात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीही गायब झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगाम हे वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा होती. 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे रब्बीच्या अशा पल्लवीत होणार आहेत