पारनेर, संगमनेर, कोपरगाव, राहता, अकोल्यात १५,३०७ हेक्टर नुकसान

प्रशासनाकडून शासनाला प्राथमिक अंदाज सादर, बारा तासात पावसाचा अंदाज

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे १५,३०७हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात पारनेर संगमनेर कोपरगाव राहता अकोले तालुक्यात केळी, पपई, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी तुरळ पाऊस झाला गेल्या बारा तासात चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून बहुतांश ठिकाणी पाऊस थांबला आहे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले असून हिवाळी अधिवेशनापूर्वी पंचनामे पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर ,कोपरगाव ,राहुरी तालुक्याला रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला .दुष्काळी दक्षिण तालुक्यातील पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नगर, नेवासे, तालुक्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत आलेले रब्बीचे पीक हिरावून घेतले. पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात १५,३०७ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ३३% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून ,11 नोव्हेंबर पासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे पंचनामे पूर्ण करण्याची काही प्रशासन करत आहे. दरम्यान पुढच्या बारा तासात नगर शहरासह जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.