राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरव

नवले, सपकाळ, जगदाळे, गिते, परदेशी व भालसिंग पुरस्काराचे मानकरी

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

 

परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आदर्श कामगार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्जेपुरा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजयराव गिते यांच्या हस्ते कर्मचार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, एकनाथ औटी, लेखाधिकारी सौ. कंगले, विभागीय वाहतुक अधीक्षक अविनाश कल्हापूरे, आस्थापना पर्यवेक्षक नितीन गटणे, विभागीय अभियंता सौ. शिंदे, भरत नलावडे, रणसिंग, कदम, सुमित अकोलकर, आर.एम. शिंदे आदिंसह विभागीय कार्यालयाने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

या कार्यक्रमात परिवहन विभागाचे वरिष्ठ लिपिक मंगल नवले, वर्षाराणी सपकाळ, लिपिक मोहन जगदाळे, सुरेश गिते, शिपाई प्रसाद परदेशी, टंकलेखक संगिता भालसिंग यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. विजयराव गिते म्हणाले की, आपले काम प्रामाणिकपणे करत असताना कामाची दखल घेऊन मिळालेला पुरस्काराने अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळत असते.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेने कर्मचार्‍यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यासाठी राबविलेला पुरस्काराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे म्हणाले की, परिवहन महामंडळ हा एक परिवार आहे. या परिवारात अनेक कर्मचारी उत्तम पध्दतीने आपली सेवा देत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींचे संघटनेचे सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर यांनी अभिनंदन केले.