निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर 

नगर : 

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.  तेव्हापासून कोतवाली पोलीस त्याच्या  शोधामध्ये आहेत.

दरम्यान वाघ यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन करण्यासाठी अर्ज सादर केला त्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली.  गुन्ह्यातील आरोपी पोलीस कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते.

 

आरोपीने गुन्ह्यात पिस्तूल, पट्टा,  मद्याची  बाटली, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे,बाकी आहे.  आरोपीचे कपडे, मोबाईल जप्त करणे बाकी असून त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.  त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अर्जून  पवार यांनी  केला.

 

आरोपी वाघ यांच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी युक्तिवाद करण्यात आला. वाघ यांच्यावर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बलत्कारासोबत खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय दंड विधानाचे ३०७ कलमही  लावण्यात आले आहे.