‘अहमदनगर दर्शन’ बससेवा सुरू करण्यासाठी महापौर. फुलसौंदर यांची मागणी

अहमदनगर :

अहमदनगर शरातील महानगरपालिका व जवळील कार्यक्षेत्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरिता आणि पर्यटन स्थळास भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक इच्छुक असतात , त्यांना त्या धार्मिक आणि पर्यटन स्थळापर्यंत शहर व स्थानकापासून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे.

याबाबत फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले , त्यात म्हटले आहे की , प्रत्येक शनिवार आणि रविवार विविध कार्यालय कॉलेज शाळा औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असते ते धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यास इच्छुक असतात, तसेच बाहेरून ही लोक पर्यटनासाठी  शहरात येत असतात.   शहरा भोवती मेहराबाद (अरणगाव) ,पिंपळगाव माळवी तलाव ,डोंगरगण,  मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, चाँदबीबी महाल, भुईकोट किल्ला,  फराहबक्ष महाल , धरमपुरी मिरावली पहाड , भैरवनाथ देवस्थान,  अगडगाव,  वस्तुसंग्रहालय हे आदि धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा मानस असतो. त्यासाठी त्यांना बस सेवा उपलब्धा करून द्यावी.

नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळनेही  पुण्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ‘पुणे दर्शन’ नावाने विशेष बस सेवा सुरू केली आहे.  या धर्तीवर नगरमध्येदेखील  ‘अहमदनगर दर्शन ‘ विशेष बस सेवा शनिवार आणि रविवार सुरू करण्याची मागणी व फूलसौंदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.