पत्नीची हत्या करून पतीचा गळफास ;

अहमदनगर : 

पत्नीस लोखंडी वस्तूने मारून तिची हत्या करून पतीने स्वतः गळफास घेतला ही धक्कादायक घटना शहरातील आगरकर मळा येथील शिवनेरी चौक परिसरात आज दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संदीप रामचंद्र गुजर (वय 53) अशा संदीप गुजर (वय 50 ) राहणार शिवनेरी चौक स्टेशन रोड, अशी मयत दाम्पत्यांची नावे आहेत.

पती संदीप गुजर यांनी पत्नी आशा गुजर हीस लोखंडी वस्तूंनी मारहाण केली,  या मारहाणीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला,  त्यानंतर संदीपने घरातील किचन रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.  या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रेड्डी ,पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे यांच्यासह कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता,  घरातील किचन रूम मध्ये संदीप गुजर यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.  पोलिसांनी घराची पाहणी केली असता अशा गुजर यांचा मृतदेह आढळून आला.  पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.  कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.