गुलमोहर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
ज्येष्ठ नागरिकांचे महापालिकेच्या विरोधात आमरण उपोषण
गुलमोहर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असून गुलमोहर रस्ता हा बऱ्याच वर्षापासून दयनीय अवस्थेत होता . काम सुरू झाल्यानंतर सर्व रहिवाशांना आनंद व समाधान झाले होते, या रस्त्याचे काम मंजूर लांबी व रुंदीनुसार उत्तम दर्जाचे व्हावे म्हणून मनपा कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर काम सुरू झालेले आहे, परंतु ते अत्यंत संथ गतीने व कुठलेही मानांकन न पाहता चालू आहे.
सदर ठेकेदार जाणून-बुजून अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अत्यंत संथ गतीने काम करत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी यांना सदर रस्त्याचा वापर करण्यास अत्यंत त्रास होत आहे रस्त्यावर बारीक खडी व कच टाकलेली असल्याने वृद्ध तसेच महिला व नागरिक घसरून पडून जखमी होत आहे. त्यास ठेकेदार व महापालिका जबाबदार आहे. सदर गुलमोहर रस्त्याचे काम हे अत्यंत संथ गतीने चालू असुन त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे सदर रस्त्याचा पाया हा लवकरच खचून जाण्याची शक्यता आहे . तसेच कच्च्या रस्त्यासाठी वापरलेला मुरूम ही मातकट असल्याने मातीचे प्रमाण जास्त आहे. सदर मुरूम चा येत्या पावसात चिखल होऊन शकतो त्यामुळे नागरिकांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागेल जर रस्त्याचा पाया पक्का नसेल तर रस्त्याचे भवितव्य किती असू शकेल? याचा नुसता विचार केलेला बरा.
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्षम भेटून तसेच रोड साइटवर भेटून याबाबत खंत मानली आहे तरी सदर मनपा अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून रस्त्याचा दर्जा तसेच रुंदीकरणाबाबत व अतिक्रमण बाबत स्वतः पाहणी करून तातडीने याबाबत योग्य ती कारवाई करावी या विविध मागणीसाठी पारिजात चौक गुलमोहर रोड येथे महापालिके विरोधात आमरण उपोषण करण्यात आले.