पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

विविध प्रकल्पाद्वारे कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उप प्राचार्या फरहाना शेख आदींसह आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेत आयोजित गणित, विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर तर विविध गणितीय सुत्रांचे प्रकल्प सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तर प्रदर्शनात सहभागी झालेल्या बालवैज्ञानिकांनी आपल्या विविध प्रकल्पाद्वारे कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक दाखवली.

विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानेंद्रिये, अन्न पिरॅमिड, जलविद्युत, सौर यंत्रणा, हायड्रोलिक जेसीबी, वायरलेस वीज, हृदय मॉडेल, ज्वालामुखीचा उद्रेक, पेरिस्कोप, न्यूटन डिस्क, किडनीचे मॉडेलचे प्रकल्प मांडले होते. विद्यार्थ्यांना मुनजा शेख, समरीन शेख, फरहीन मिर्झा, सानिया शेख, कशफ शेख, जाकीर मोमीन, श्रद्धा आढाव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.