दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप

भिंगार हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम

शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना मनमोकळ्या वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सर्व परीक्षा सारखे असतात, मात्र दहावी बोर्डाची परीक्षा महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात मोठे दडपण असते. त्यांच्या मनातील दडपण दूर करण्यासाठी व त्यांना तणावमुक्तीने हसत खेळत  परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दहावी बोर्ड पहिली पायरी असून, या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.