फेसबुक वर मैत्री करून एकास लाखो रुपयांचा लावला गंडा

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येतात, ती एक्सेप्ट केली जाते आणि यातून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो ही गोष्ट नवी नव्हे अशीच एक घटना कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये घडली. राशीन येथिल एका नोकरदाराला अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्याने ती खातरजमा न करता स्विकारली जाते त्यानंतर दोघात मैत्री  आणि मग व्हाट्सअॅपवर तर फोनवर बोलणे सुरू झाले . मग तिकडून ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली . विनंतीला प्रतिसाद देत लाखोंची गुंतवणूकही केली अन् तेथेच कधी घात झाला .
              राहुलकुमार श्रीधर राऊत ( रा . कोल्हापुर ) गडहिंग्लज , सध्या नोकरीनिमित्त ( रा . राशीन ता . कर्जत ) यांना राहुल नामदेव कवाडे ( रा . आवळे बुद्रुक ता . राधानगरी जि . कोल्हापुर ) याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती . त्यानंतर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून दोघांची मैत्री झाली व बोलणे सुरू झाले . मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने फिर्यादिस ” मी ट्रेडिंग सुरू केले असुन कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा . एक लाखाला प्रतिदिवसाला पाच हजार देतो आणि रक्कम जेंव्हा परत हवी असेल तर लगेच माघारीही देतोय असे सांगुन मोबाईलवर बँक अकाऊंटबाबतची माहिती पाठवली . ” तुम्ही दोन लाख ३० हजार गुंतवा , मी रोज २० हजार तुम्हाला देत जाईल व जेंव्हा सर्व रक्कम लागेल तेंव्हा परत करेल . मी कुणालाही फसवले नाही , असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला . शेअर मार्केटमध्ये नफा किंवा तोटा झाला तरी रोज २० हजार मिळतील . यावर विश्वास ठेवत फिर्यादीने एकून दोन लाख ३० हजारांची रक्कम आरोपीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली . त्यानंतर कवडेने मोबदला म्हणुन फिर्यादीला तीन वेळा करून ५२ हजार रुपये पाठविले . त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली . फिर्यादीने गुंतवलेली दोन लाख ३० हजार रक्कम परत मागितली . असता ” आज – उद्या देतो ” करत राऊत यांचा मोबाईल नंबर ब्लॉक केला . त्यानंतर आरोपीने ११ नोव्हेंबरला ५० हजार तर दुसऱ्या दिवशी एक लाख असे एकुण एक लाख ५० हजार पाठवले . गुंतवणुकीचे ८० हजार आणि नफ्याचे आठ नोव्हेबर नंतरचे २० हजार प्रमाणे येणे बाकी होते . फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने हा सर्व प्रकार आरोपी कवडेच्या पत्नीस फोन कॉलवर सांगितला . १३ नोव्हेबर कवडेने फिर्यादीच्या व्हाट्सअॅपवर मेसेज करून आत्महत्येची धमकी दिली . यावरून पोलिसांनी आरोपी राहुल कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला .