रिलसाठी काहीही! काकांनी चक्क बसस्टॉपवर केला अतरंगी डान्स; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण रिल्स बनवण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिल बनवण्याच्या नादात एका काकाने चक्क बस स्टॉपवर डान्स केला आहे. त्यांचा विचित्र डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. डान्सचे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण असा डान्स तुम्ही कधीही पाहिला नसेल.
लोकं सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करतात. कधी डान्स करतानाचे तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडीओत एका काकाने अचानक बस स्टॉपवर डान्स केला आहे.काकांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.