भाजपचं ‘नो रिस्क’ धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली

‘अबकी बार 400 पार’ नारा देत भाजप मित्र पक्षांसोबत मिळत तयारी लागली आहे. महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नो रिस्क धोरण ठरवल्याचं दिसून येत आहे. त्यासोबत भाजपने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून अमित शाह यांनी घेतली मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली जात आहे. सद्यस्थितीत महायुती किती जागा जिंकू शकते, याचीही अमित शाह यांनी माहिती घेतली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुासार, पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल, याचीही माहिती केंद्रीय नेत्यांनी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपने मुंबईमध्ये 5-1 चा प्रस्ताव ठेवला आहे, मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याची माहिती आहे. भाजपचा प्रस्ताव शिंदे गटाला मान्या नसल्यानं मुंबईतील जागाबाबतचा अंतिम निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.