लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम.
पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.
शरद पवार ,अजित पवार तसेच सुप्रिया सुळे हे आपल्यासाठी दैवत असून यांचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असेल असेही ते म्हणाले .त्यांच्या शब्दापुढे जायचं नाही अशी मर्यादा मी ठरवलेली आहे .पक्षाचे नेते जे सांगतील किंवा पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक लढवू आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू असही ते म्हणाले.