अहमदनगर : महाराष्ट्रात सर्वाधिक अपघाती मृत्यू मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे ग्रामीणमध्ये होतात. या जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक सहाशेहून अधिक अपघात झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात या कालावधीत 600 पेक्षा जास्त अपघातांची नोंद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. या अपघातामध्ये टॉप फाईव्हमध्ये समावेश झाल्याने अहमदनगर जिल्हा अपघातांचे हॉटस्पॉट बनले आहे. वाहतुकीचे नियम व वेग मर्यादा न पाळल्याने सर्वाधिक अपघात होतात. जिल्ह्यातून पुणे, मनमाड, छत्रपती संभाजीनगर सोलापूर कल्याण महामार्ग जातात या मार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडताना दिसतात जिल्ह्यांतर्गत रस्त्यांचे दुरावस्था झाल्याने अंतर्गत रस्त्यावर अपघात होत असून सर्वाधिक अपघात दुचाकीचे होतात. पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांचे काम उखडले असून वाहतुकीचे नियम न पाळणे, हेल्मेट नसणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे या अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. हे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरटीओ आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे अपघात रोखण्यात जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. यामुळे किरकोळ अपघातात सामान्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.