ॲमेझॉनरून 55,000 च्या मोबाईलऐवजी, अर्धा डझन चहाचे कप

मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीने ॲमेझॉनवरून सुमारे 55 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन बेस्टचे उपअभियंता अमर चव्हाण यांनी ऑर्डर केला होता. टेक्नो फॅटम व्ही फोल्ड मोबाईल फोन दिनांक 13 जुलै रोजी त्यांनी मागवला होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले. मात्र या ऑर्डरची दोन दिवसानंतर त्यांना डिलिव्हरी मिळाली. त्यामध्ये त्यांना अर्धा डझन चहाचे कप मिळाले. या संदर्भात बेस्टचे उपअभियंता अमर चव्हाण यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीमध्ये त्यांनी नोंदवले आहे की, मी पार्सल उघडले तर तेव्हा मला अर्धा डझन चहाचे कप आढळले. त्यानंतर मी ॲमेझॉन तसंच विक्री करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मी पोलिसात धाव घेतली आहे. या उदाहरणावरून ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे