वडगाव गुप्ता गट नं. 695 येथील नागरीकांना रहिवाशी दाखले मिळावे, या मागणीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नगर- अहमदनगर शहराजवळ असणार्या वडगाव ग्रामपंचायत ची स्थापना 1951 साली झाली असून.. त्यानतर 1983 साली सिटी सर्व्हेझाला.परंतु सिटी सर्व्हेहोऊन 41 वर्षानंतर देखील येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वडगाव गुप्ता ग्रामपंचायत येथील गट नंबर 695 या भूखंडाची माननीय विशेष जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांनी चौकशी करून त्यानंतर गट नंबर 695 हा भूखंड नियोजित वाढीव गावठाणापैकी एक असल्याचं रेकॉर्ड वरती उतार्यात नमूद करण्यात आलेलं आहे. या जागेवरती गेली अनेक वर्षापासून रहिवासी राहत असून ते ग्रामपंचायतीचा कर देखील भरत आहे तरी देखील शासकीय यंत्रणा गट नंबर 695 मधील रहिवाशांकडे भोगवाटदार म्हणून व अतिक्रमण धारक म्हणून पहाते. त्यामुळे या जागेवर राहणार्या रहिवाशांना कर्ज घेताना किंवा जमीन हस्तांतरण करताना तसेच ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अर्ज भरताना मोठ्या अडचणी निर्माण होतात तसेच गट नंबर 695 मध्ये रहिवाशांना मतदानाचा हक्क आहे. परंतु ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अपात्र म्हणून ठरविले जाते. त्यामुळे या जमिनीची महाराष्ट्र शासन अशी दप्तरी असलेली नोंद शासकिय नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरुन घेवून सदरची नोंद कमी करावी व गट नं.695 याशासकीय गटाची मोजणी ड्रोन कॅमेरा वरुन किंवा सॅटेलाईट व्दारे करुन मा.ऊच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन 1995 पर्यंत च्या सर्वांचे अतिक्रमण कायम करुण मालकी हक्काचे ऊतारे देऊन येथील वसाहती नियमानुकूल कराव्यात व येथील रहिवाशांना रहिवासी पुराव्याचे दाखले द्यावे अशी विनंती आज येथील रहिवाशांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी वि.वि.कार्य.सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब डोंगरे, शामराव पिंपळे भाजपा उपाध्यक्ष, उमेश डोंगरे ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता ,विजय डोंगरे, दिलीप गव्हाणे ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता, गणेश डोंगरे ,निखिल शिंदे, दीपक शिंदे (मा.ग्रा.प.सदस्य) व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.