भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा

डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांनी आधुनिक भारताच्या विकासात्मक दूरदृष्टीने पायाभरणी केली -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात कॅन्टोन्मेंटसह इतर अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात अभियंते गणेश भोसले, नागेश खुरपे, सुनील हळगावकर, रमेश कोठारी, सचिन कस्तुरे, निखिल शिंदे, राहुल कपाळे, छावणी परिषदेचे कार्यकारी अभियंता महेंद्र सोनवणे, अशोक फुलसौंदर, जलसंपदा विभागचे निवृत्त अधीक्षक अभियंता शिवाजीराव बोलभट यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुमेश केदारे, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे, दिलीप गुगळे, जहीर सय्यद, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज आनावडे, अशोकराव पराते, सर्वेश सपकाळ, अविनाश जाधव, विठ्ठल राहिंज, अभिजीत सपकाळ, संतोष हजारे, सुधीर कपाले, अविनाश पोतदार, जालिंदर अळकुटे, संतोष लुनिया, कुमार धतुरे, राजू कांबळे, सखाराम अळकुटे, सूर्यकांत कटोरे, शेषराव पालवे, किरण फुलारी, रमेश धाडगे, राजू शेख, एकनाथ जगताप, नामदेव जावळे, विकास निमसे, सुनील कसबे, योगेश चौधरी, संजय भावसार, संदीप शिंगवी, रामभाऊ झिंजे, विनोद खोत, दशरथ मुंडे, संजय बकरे, गोरख उबाळे, सुनील बग्गन आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले भाररत्न डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांनी आधुनिक भारताच्या विकासात्मक दूरदृष्टीने पायाभरणी केली. त्यांनी उभारलेले अनेक प्रकल्प प्रेरणादायी आहे. देशाच्या विकासात्मक वाटचालीत डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांच्या प्रेरणेने काम करणारे अभियंते देशाच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उपस्थित अभियंत्यांनी समाजाकडून होत असलेला सन्मान भविष्यात आनखी चांगले काम करण्यास स्फुर्ती देणारा आहे. डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांनी भारताला विकासाचा एक नवीन मार्ग दाखवला असून, आजही सर्व अभियंते त्या मार्गावर चालत असल्याची भावना व्यक्त केली. आभार ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज आनवडे यांनी मानले.