एक लस करेल, मुलींचे कर्करोगापासून संरक्षण
गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग आहे. यावेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे ही लस बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. रोटरी क्लब अहमदनगर प्रियदर्शनीच्या माध्यमातून १००० गरजू मुलींना मोफत लसीकरण करून त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठे योगदान देण्यात येत आहे. ही मोहीम समाजातील गरीब कुटुंबातील मुलींना लसीकरणाचे संधी देत आहे. प्रत्येकी २५०० रुपये किमतीच्या एकूण २५ लाख रुपये किमतीच्या लसी यामध्ये दिल्या जाणार आहे. लसीकरणासाठी मुलींना पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणी केल्याशिवाय लसीकरण दिले जाणार नाही. नोंदणीसाठी पालकांचे संमती पत्रासह मुलींचे आधार कार्ड आणि पिवळा किंवा केशरी शिधापत्रिकेचे झेरॉक्स द्यावे लागेल. लसीकरणाच्या पूर्ण नोंदणीसाठी आवश्यक अर्ज कापड बाजार येथील सितरामल कुंदनमल ज्वेलर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. या मोफत लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मुलींमध्ये आणि पालकांमध्ये सदर कर्करोग आणि त्याचे दुष्परिणाम तसेच फायदे याबाबत नगर शहरातील विविध शाळेत मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात येत आहे.