शिष्यवृत्ती नोंदणी होणार ऑनलाइन
मात्र, अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीसाठी बहुतांश शाळांची ऑनलाइनकडे पाठ
अहमदनगर : अनुसूचित जाती “प्रवर्गातील मुला-मुलींना उच्च शिक्षण “घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असलेली योजना ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे किती शाळा ऑनलाइन नोंदणी करणार, हा प्रश्नच आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) प्रवर्गातील विद्याथ्र्याना निर्वाह भत्ता दिला जातो व संबंधित शैक्षणिक संस्थेस शिक्षण फी, परीक्षा की अदा केली जाते, या योजनेंतर्गत (नवबौद्धांसह) ट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदापासून ही पालकांचे उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्यात आली आहे. विशाळांनी नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आता योजना ऑनलाइन झाल्यामुळे अनेकदा शाळा ऑनलाइन नोंदणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शाळांकडे नोंदणी करण्याचा आग्रह करावा. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण अनेक कारणामुळे वाढत आहे हे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले नावाची शिष्यवृत्ती योजना सुरू आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींना उच्चशिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे, यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.गुणवत्ता शिष्यवृत्ती अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहावेत यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात येत असते. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याला शाळांची उत्तम साथ मिळाली तर खऱ्या अर्थाने गाव-खेड्यातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात सामील होऊ शकेल.