अहमदनगर महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकांचे सामूहिक वाचन
विद्यार्थ्यांनी वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी पुस्तक वाचनावर भर द्यायला हवा- प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस
नगर- आजच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वाचनाकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यात आजचे युग हे स्पर्धेचे आणि संगणकाचेदेखील मानले जाते. आजची युवा पिढी तर मोबाइल (भ्रमणध्वणी )मुळे वेगळ्याच विश्वात अडकली आहे. आज या सर्वांना मोबाइल, संगणक, लॅपटॉपसारख्या उपकरणांमुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम इत्यादीचे जणू व्यसनच लागले आहे. आज विद्यार्थ्यांना आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपले करिअर घडवण्यासाठी पुस्तक वाचनावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी केले.
वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, समाजप्रबोधन करणे, तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथालय, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, करिअर कट्टा, मराठी विभाग, हिंदी विभाग आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकांचा सामूहिक वाचन आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस बोलत होते.
ग्रंथ प्रदर्शन व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकांचे सामूहिक वाचन या स्पर्धेत महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी महाविद्यालयातील ग्रंथालयात व ग्रंथालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये , विद्यार्थी व लेखक साहित्यिक यांच्यामध्ये वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकांचे सामूहिक वाचन यासारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी उपप्राचार्य प्रा.दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभाग प्रमुख प्रा . डॉ . सय्यद रज्जाक, उपप्राचार्य डॉ . नोएल पारगे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री पिटर चक्रनारायण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचारी श्री जॉय भांबळ, श्री अमोल लोंढे, सौ शिल्पा खिल्लारी, श्री आकाश देवरे, आणि सौ सोनाली कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संगणक विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ प्रशांत फुगनर,.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी केले. तर आभार विकास बांगर सहा. ग्रंथपाल, मानले.