केडगावला होणार पोलीस ठाणे .

अहमदनगर —- कोतवाली पोलीस ठाण्याचे विभाजन होणार असून कोतवाली हद्दीतील केडगाव उपनगरांसह नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या २२ गावांचे मिळून स्वतंत्र पोलीस ठाणे आता केडगावला होणार आहे . याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे .

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा हद्दीत नागरी वसाहती वाढल्या आहेत . लोकसंख्येचा तुलनेत पोलिसांचे संख्याबळ अपुरे आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे विभाजन करून केडगाव ला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा निर्मितीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे सादर केला होता . हा प्रस्ताव मान्य होऊन त्यास मंजुरी घेण्यात आली आहे . स्वतंत्र पोलीस ठाण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे . आणि या पोलीस ठाण्यात नगर तालुक्यातील २२ गावांचा समावेश होणार आहे .

केडगावचा स्वतंत्र पोलीस ठाण्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याबरोबरच नगर तालुका पोलीस ठाण्याचेही विभाजन होणार आहे . तालुक्यातील ६४ गावे सध्या नगर तालुका पोलीस ठाण्याचा , ३१ गावे एमआय डीसी पोलीस ठाण्याचा हद्दीत तर ११ गावे कॅम्प पोलीस ठाण्याचा हद्दीत आहेत . नगर तालुका पोलीस ठाण्याअंतर्ग येणारी काही गावे आता केडगाव पोलीस ठाण्याचा हद्दीत जाणार आहेत , यामध्ये बुरूडगाव , अरणगाव ,खंडाळा , खडकी ,जाधव वाडी ,अकोळनेर ,सारोळा , कासार ,घोसपुरी , बाबुर्डी बेंद , भोरवाडी , कामरगाव , पिंपळगाव , कौडा ,भोयरे पठार , भोयरे खुर्द ,पिंपळगाव वाघा , चास , सोनेवाडी ,हिवरे बाजार , निमगाव वाघा , जखणगाव , खातगाव या गावांचा समावेश असणार आहे