संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा
चास (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचे बुधवारी (दि.२२फेब्रुवारी) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिरात रविदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संत गुरु रविदास महाराजांचे विचार व कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रवीणभाऊ केदारे यांनी स्वत:च्या जागेत स्वखर्चाने रविदास महाराजांच्या मंदिराची उभारणी केली आहे. शहरापासून साधारण ९कि.मी. अंतरावर नगर-पुणे महामार्गालगत चास येथील केदारे वस्ती येथे मंदिर निर्माण करण्यात आले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम व मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी दिली.