कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा
कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा
कळमनुरी तालुक्यातील वांगर फाटा शिवारात एक कार मधील साडीच्या गाठोड यामध्ये 36 किलो गांजा आढळून आला आखाडा बाळापूर पोलिसांनी एक कारसह ९.९८ लाखाच्या ऐवज जप्त केला मात्र पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत एका तरुणासह त्याच्या साथीदारावर रविवारी 3 डिसेंबर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारंग फाटा शिवारात एक कारमधून गांजा विक्रीसाठी आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून आखाडा बाळापूर पोलिसांनी पहाटे दीड वाजेपासून वारं फाटा परिसरात तपासणी सुरू केली होती यामध्ये एका शाळेच्या पाठीमागे कार उभी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र पोलीस येत असल्याचे लक्षात येताच शाळे जवळ असलेले सर्व आरोपींनी पळ काढला पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात असलेल्या साडीच्या गठोड्यात गांजाचा फंदा आढळून आला ह्या गांजाची वजन 36 किलो असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी गांजा कार असा सुमारे 9.18 लाख रुपयांच्या एवज जप्त केला आहे पोलिसांनी कारचा तपासणीमध्ये एक आधार कार्ड सापडले आहे यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याची तयारी सुरू केली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीवार यांनी दिले आहे तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रवी रामराव राठोड राहणार घोडजतांडा जिल्हा नांदेड व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे