कामरगाव येथील कठडा नसलेला पूल बनला धोकादायक

नगर पुणे महामार्ग वरील कामरगाव तालुका नगर येथील पुलावरील संरक्षण कठाळात तुटला आहे. नगरवरून पुण्याला जाताना अर्धा गोलाकार तीव्र उतारा नंतर लगेच हा फुल येतो. कठडे नसल्याने आजवर अनेक अपघात येथे झाले आहे. कामरगाव तालुका नगर गावच्या लागत वालुंबा नदीच्या पुलावरील 15 मीटरच्या सुरक्षण कठरात तुटला आहे. वाहन चालकांना व सदाचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नगर पुणे महामार्गावरून दररोज हजारो वाहन व प्रवासी प्रवास करीत असतात नगर वरून पुण्याकडे जाताना पुलाच्या पाठीमागे तीव्र गोलाकार उतार असून वाहन चालकांना वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे येथे आठवड्यातून किमान दोन वेळा अपघात होतात. या ठिकाणी अपघाताचे वळण कमी करावे व संरक्षक कठडे दुरुस्त करावा याबाबतचे लेखी निवेदन अॅड प्रशांत साठे, श्रीराम बॉईजचे अध्यक्ष शिवा भाऊ सोनवणे व सरपंच तुकाराम कातोरे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याला एक महिन्याचा कालावधी होऊन देखील कंपनीचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करीत आहेत. सदरहून काम आठ दिवसात पूर्ण करावे, अन्यथा कंपनी, कार्यालय पुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा अॅड प्रशांत साठे, शिवाभाऊ सोनवणे व सरपंच तुकाराम कातोरे संदीप ठोकळे मे. संतोष गायकवाड, राहुल आंधळे, अरविंद ठोकळे, बाबू आंधळे यादींनी आदींनी दिले.