मोदी आवास योजनेत इतर मागासवर्गाला हक्काचा निवारा
ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल दिले जाते यासाठी 10 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आता मोदी आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला पक्के घरकुल बांधून देण्यात येत आहे ग्रामीण भागात अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. मोदी आवास योजनेत ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी एक लाख वीस हजारांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी करतात. त्यानंतर जिल्हा निवड समिती निकषानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाते. ग्रामसभेतून निवड या योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायती ग्रामसभेत पात्र आणि गरजू लाभार्थ्यांच्या नावाची घरकुल योजनेसाठी वरिष्ठ स्तरावर शिफारस करते
निकष
ग्रामसभेने निवड केलेला लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे याची निवड राज्यस्तरीय समिती करते. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा अधिक नसावे, लाभार्थ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा प्रधानमंत्री आवास योजनाच्या यादीत त्याचे नाव नसावे, इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील ओबीसी प्रवर्गातील गरजू नागरिकांना मोदी आवास योजनेच्या माध्यमातून हा पक्का निवारा देण्यात येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांचे पक्क्या निवाऱ्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. पक्क्या घरकुलासाठी शासनाकडून अर्थसाह्य देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे घरकुलासाठी मागणी करावी घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.