‘येऊ कशी तशी मी नांदायला’  मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई : 
लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपलं माहेर सोडून एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची मैत्रीण  झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका लवकरच  झी मराठीवर प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ असं या मालिकेचे नाव आहे.
 
ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूच्या नात्याची. या दोघी सासू सूना आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत. मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’   
 
या मालिकेची पटकथा सुखदा आयरे, कथा विस्तार समीर काळभोर आणि संवाद किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांची आहे.  मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर करत आहेत. 
 
शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता  या मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे.
 
सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवीने मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे.  मानसीने याआधी झी मराठीवरील सौदामिनी आणि नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.