पुणे:
पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना घडलीय. २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या २ जणांनी तिथल्या वॉचमनला चाकू दाखवला आणि पकडून ठेवत वरती जाऊन कटरच्या सहाह्याने फ्लॅट चे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्यामुळे चोर आले आहेत हे लक्षात आल्यामुळे सोसायटी मधील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला, थोड्याच वेळात पोलीस Bike वरून सॊसायटीत हजरही झाले. त्यांनी चोरांना आलेलं बघितलं हि, पण पोलिसांनी स्वतःकडे बंदूक असतांनाही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याचे CCTV मध्ये कैद झाल आहे.
त्याच्यानंतर चोरटेसुद्धा पळाले, हि घटना घडत असताना पोलिसांकडे Wireless Phone होते , त्यांनी जर ठरवल असत तर ते चोरट्यांना पकडू शकले असते, मात्र या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही..या घटनेवरून आता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्यामुळे पुणे शहरात घरफोड्या व गुन्हेगारी वाढत चालली असल्याची चर्चा रंगली आहे.